
गेल्या काही दिवसांपासून देशभरात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू होती. त्यात आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत सुरू झालेल्या राजकीय घडामोडींची देखील भर पडली आहे. आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी बिगरभाजपा विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यासंदर्भात बैठकीनंतर या पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनी माहिती दिली आहे.
शरद पवारांनी केली घोषणा!
आज दुपारी दिल्लीतील शरद पवारांच्या ६ जनपथवरील निवासस्थानी बिगर भाजपा विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकूण १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमताने मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. “सर्व बिगर भाजपा पक्षांपैकी अनेकांशी आमची चर्चा झाली. देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून आम्ही एक उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेतला. मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या, गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिला आहे. त्या राज्यसभा सदस्य देखील होत्या. आम्ही काही नावांवर चर्चा केली आणि शेवटी ए
मार्गारेट अल्वांच्या नावाला कुणाचा पाठिंबा?
विरोधी पक्षांचा अल्वा यांच्या नावाला पाठिंबा असल्याचं शरद पवार म्हणाले. “काँग्रेस, डीएमके, सपा, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसव्ही, मणी काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय, सीपीआयएल, नॅशनल काँग्रेस, आरएलडी अशा एकूण १९ पक्षांचा पाठिंबा अल्वा यांच्या उमेदवारीसाठी मिळाला आहे. आम्ही ममता बॅनर्जींनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या बैठकीमध्ये होत्या. आम्ही अरविंद केजरीवाल यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून असा निरोप आला आहे की त्यांनी ज्याप्रमाणे विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पाठिंबा दिला, तसाच देखील ते पाठिंबा देतील”, असं देखील पवार म्हणाले.
येत्या मंगळवारी अर्थात १९ जुलै रोजी मार्गारेट अल्वा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्ष जाणार असल्याचं देखील शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
कमताने मार्गरेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


