लातूर : मित्रांशी बोलत नाही म्हणून तरुणाला सिगारेटचे चटके देत जबर मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

लातूर : मित्र हे आयुष्यात फार महत्वाचे असतात. पण अनेकदा काही कारणावरुन मैत्रित दुरावा निर्माण होतो आणि एकमेकांशी संपर्क कमी होतो. मात्र, लातूरमधून एक अजब बातमी समोर आली आहे. मित्रांची संगत सोडल्याने एकाला त्याच्याच मित्रांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. तू आमच्याशी बोलत का नाही? असा जाब विचारत तिघांनी विजय पाचंगे नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली आहे. त्यामुळे मित्रांची साथ सोडणं या तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे.

या तरुणाच्या हातावर आणि पायावर सिगारेटचे चटके देऊन बेल्टने जबर मारहाण करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील येणकी-माणकी येथे ही घटना घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Follow us -

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय शिवाजीराव पाचंगे या तरुणाला अक्षय कळसे याच्यासह अन्य दोघांनी संगनमत करून मारहाण केली आहे. "तू आमच्यासोबत का बोलत नाहीस? आमच्यासोबत का राहत नाहीस?" याचा मनात राग धरून शिवीगाळ करून बेल्टने जबर मारहाण केली.

शिवाय, डोक्यावर मारून खाली पाडले. जमिनीवर कोसळल्यानंतर त्याच्या हातावर, पायावर सिगारेटचे चटके दिले. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत उदगीर ग्रामीण ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply