बुलढाण्यातील कोलवड इथं लग्नाच्या आनंदी वातावरणाचं रुपांतर रक्तरंजित घटनेत झालं. लग्नसमारंभाला हिंसाचाराचं गालबोट लागलं. कावड यात्रेदरम्यान झालेल्या जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या धक्कादायक घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून चाकूहल्ला करणारे आरोपी फरार आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
गावातील एका लग्नसमारंभात गौरव जाधव नावाचा तरुण उपस्थित होता. लग्नसोहळ्यादरम्यान पंगतीत जेवताना त्याचा दुसऱ्या तरुणाशी वाद झाला. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कावड यात्रेदरम्यान गौरवचा गावतल्या नितीन सपकाळ या तरुणाशी वाद झाला होता. त्याच कारणावरून लग्नातील जेवणाच्या पंगतीत पुन्हा या दोघांमधील वाद चिघळला. हा वाद वाढताच नितीन सपकाळ याने त्याच्यासोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू आपल्या हातात घेतला अन् गौरवर सपासप वार केले.
या हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गौरववर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरव आणि नितीन यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी लग्नातल्या काही पाहुण्यांनी पुढाकार केला असता त्यात तेसुद्धा किरकोळ जखमी झाले. अरुण जाधव नावाच्या व्यक्तीला दुखापत झाल्याची माहिती आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाची पुढील तपासणी पोलीस करत आहेत. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बुलढाण्यात भर लग्नसमारंभात चाकूहल्ल्यासारखी धक्कादायक घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये नितीन आणि गौरव यांच्यात झालेला वाद स्पष्ट पहायला मिळतोय. लग्नसमारंभानंतर जेवणाची पंगत सुरू असताना अचानक दोघं एकमेकांशी भांडू लागतात. यादरम्यान इतर काहीजण त्यांची मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तितक्यात एक तरुण चाकूने दुसऱ्यावर सपासप वार करतो आणि तिथून पळून जातो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहायला मिळत आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


