रायगड : महसूल सहाय्यकांच्या संपामुळे कामे खोळंबली; कार्यालयांमध्ये शुकशुकाट

अलिबाग : प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक यांनी बेमुदत संप  पुकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय व महसूल कार्यालयांमध्ये  शुकशुकाट पसरला आहे. संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने कर्मचारी कामावर नसल्याने नागरिकांचीही कामे रखडली आहे.

महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तातडीने भरणे, भरतीबाबत काल मर्यादा निश्‍चित करणे, पदोन्नतीची तारीख निश्चित करून देणे, दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करणे, वैद्यकीय कॅशलेस सुविधा देणे या आणि अशा अन्य मागण्यांसाठी अव्वल कारकून, महसूल सहाय्यक अशा ४९७ कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता. ४) बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. मात्र, यावर सरकारकडून तोडगा न निघाल्याने संपकरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत; परंतु या संपामुळे नागरिकांची कामे रखडली आहेत.

कर्मचारी संपावर गेल्याने रेशन कार्ड मिळण्यास दिरंगाई होत असून उपविभागीय कार्यालयापासून तहसील कार्यालयातून मिळणारे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले हे आणि असे इतर दाखले मिळण्यास उशीर होत आहे. जिल्ह्यातील पालखी, सोहळ्यांसाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज करण्यात आले आहेत; परंतु कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांना परवानगी मिळण्यास उशीर होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply