राज्यभरातून शिवरायांना मानाचा मुजरा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार शिवनेरीवर…

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती आहे. राज्यभरात मोठा उत्साह लोकांमध्ये बघायला मिळतोय. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्रीपासूनच शिवनेरी गडावर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे शिवनेरी गडावर पोहोचले. शिवनेरी गडावर शासकीय कार्यक्रमांचा एक थाट बघायला मिळतोय. ढोल ताशाच्या गजर शिवनेरी किल्ल्यावर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजावत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. किल्ले शिवनेरीवर 396 वी शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे.

शिवाई देवी मंदिरात शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांचा मोठा उत्साह गडावर बघायला मिळतोय. फक्त शिवनेरी किल्लाच नाही तर राज्यातील विविध ठिकाणी मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार.

422 किल्ल्यांच्या नावांतून उभा राहिला शिवछत्रपतींचा तेजोमय पोर्ट्रेट चित्राचा अविष्कार. संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांची दोन दिवसांची परिश्रमपूर्वक कलासाधना. धाराशिव-तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात सिंहासन पूजा करून शिवअभिषेक करण्यात आला. यानिमित्त तुळजाभवानी मंदिरात शिवभक्तांनी प्रदक्षिणा घालत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला यावेळी महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील मराठा वस्ती परिसरातील मंडळाने घालून दिला नवा आदर्श. मागील 7 वर्षापासून डीजेमुक्त शिवजयंती साजरी करत केला जातोय शिवजागर. डीजेचा खर्च टाळत परिसरातील महिलांना मराठमोळी साडी-चोळीचा पोशाख दिला जातोय भेट. मराठी संस्कृती, परंपरा टीकावी आणि डिजेमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. मंडळाच्या या संकल्पनेचे कौतुक संपूर्ण शहरात होत आहे.

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चित्रकाराकडून महाराजांना अनोखे अभिवादन. शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील विजयानंतरच्या क्षणाचे 5 बाय 8 फुटाचे चित्र साकारले. सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे यांनी साकारली कलाकृती. शिवाजी महाराज किंवा त्यांचे मावळे जेव्हा एखादा किल्ला जिंकायचे तेव्हा ते त्या किल्ल्याची पाहणी करायचे. नेमका हाच क्षण चित्रकार नितीन खिलारे यांनी आपल्या कॅन्वास वर साकारले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *