
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रात्री उशिरा त्यांना अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ईडीने कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. यातील १० लाखांच्या रकमेवर एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “एकनाथ शिंदेंच्या विरोधात काही करायचं असेल आणि त्यासाठी अयोध्येला जायचं असल्याने ते पैसे राखीव ठेवले असल्याची शक्यता आहे. प्रत्येक पैशाचा स्त्रोत दाखवावा लागतो आणि तो संजय राऊतांकडे असणार. ते हुशार, बुद्धिमान असून मुद्दाम असं काही लिहिणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा याच्याशी काही संबंध नाही”.
“आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आमदारांना पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आम्ही त्यांना आमची घरं तपासून पाहा, पैसै सापडणार नाहीत असं आवाहन केलं होतं. कारण हा पैशांसाठी केलेला उठाव नव्हता,” असं केसरकर म्हणाले.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


