
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी ४ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची चर्चा रंगली होती. सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली होती. यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली असल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं.
दरम्यान, या भेटीची चर्चा ताजी असतानाच, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांची आज सायंकाळी ४ वाजता भेट घेणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी राजकीय विषयावर चर्चा होणार असल्याचं कळतंय.
शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेना नेमकी कुणाची यावरून सध्या सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. अशातच जर सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव बेकायदेशीर ठरवला आणि उद्धव ठाकरे यांच्याबाजूने निकाल दिला, तर शिंदे गटाला दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलिन व्हावं लागेल. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मनसेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजप मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चाही सुरू आहे. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
- नागपुर: हृदयद्रावक घटना; जेईईच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने १७ वर्षीय वैदेहीची आत्महत्या!
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
गुन्हा
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.
























Subscribe to my channel



