मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट? चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी ४ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची चर्चा रंगली होती. सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली होती. यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली असल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं.

दरम्यान, या भेटीची चर्चा ताजी असतानाच, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांची आज सायंकाळी ४ वाजता भेट घेणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी राजकीय विषयावर चर्चा होणार असल्याचं कळतंय.

शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेना नेमकी कुणाची यावरून सध्या सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. अशातच जर सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव बेकायदेशीर ठरवला आणि उद्धव ठाकरे यांच्याबाजूने निकाल दिला, तर शिंदे गटाला दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलिन व्हावं लागेल. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मनसेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजप मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चाही सुरू आहे. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply