मुंबई : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर; मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गाच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला होता. पण आता उद्धाटन पुढे ढकलण्यात आले आहे. समृध्दी महामार्गाचे उद्धाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते २ मे रोजी होणार होते. पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर पडले असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. वाईल्ड लाईफ व्होहर पाथ नागपूर पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामधे विशेष अर्च तयार करण्यात आले आहेत. त्यातील १०५ नंबरचे अर्च खराब झाले आहे. त्यामुळे ते सुपर स्ट्रक्चर नव्याने बनवायचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. लवकरच पुढील तारीख कळवण्यात येईल, अस मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

समृद्धी महामार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण अनेक कारणांमुळे प्रकल्पाचे काम विलंबाने सुरू आहे. असे असताना नागपूर ते सेलू बाजार, वाशीम या २१० किमीच्या टप्प्यातील १०० टक्के काम पूर्ण झालं आहे. निविदा सादर करण्यासाठी २५ एप्रिल अंतिम तारीख असून २ मेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून टोल यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण कऱण्याचं आव्हान सध्या आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हे ७०० किमी अंतर केवळ सात तासांमध्ये पार करता येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “मुंबई : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर; मंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply