मुंबई : विक्रोळीतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई : विक्रोळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमधील २३ व्या मजल्यावरील उद्वाहन कोसळून बुधवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले. विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील उद्वाहनाचे काम बुधवारी सुरू होते. मात्र अचानक दुपारी २.३० च्या सुमारास उद्वाहन २३व्या मजल्यावरून खाली कोसळले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन कामगाराची सुटका केली. मात्र शिवम जैस्वाल (२०) हा कामगार या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास प्रयत्न करून त्याला उद्वाहनाबाहेर काढले. त्यानंतर त्याला परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *