मुंबई : राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

मुंबई : मुंबईमध्ये राण दाम्पत्याच्या अटकेवरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. हनुमान चालीसेवरून सुरु झालेला वाद हा टोकाला गेला. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा  यांना काल खार पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांना आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणी पार पडली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील सुनावणी २९ तारखेला पार पडणार आहे. पोलिसांनी कस्टडी मागितली होती परंतु न्यायालयाने याला विरोध केला आहे.

मात्र, सुनावणी अगोदर नवनीत राणा यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कलम ३५३ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवणीत राणा यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप लावण्यात आलाय. या प्रकरणात नवनीत राणा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचणारच असे नवनीत राणा यांनी म्हटले होते. यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने- सामने आल्याचे पहायला मिळाले आहे.

शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या राड्यानंतर अखेर नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवि राणा यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. वळसे पाटील यांनी म्हटले होते की, हनुमान चालीसेच्या आडून दंग भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणात कोणाची देखील गय केली जाणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई होणार आहे. यानंतर नवनीत राणा आणि रवि राणा यांना अटक करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply