मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सध्या राणा दाम्पत्य तुरुंगात असून, त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेनं (BMC) नोटीस बजावली आहे. नोटिशीनुसार, खार येथील इमारतीतील राणांच्या घरात मुंबई महापालिकेकडून पाहणी केली जाणार आहे. घरात अवैध बांधकाम केल्याचा संशय पालिका प्रशासनाला आहे. वाढीव बांधकाम आणि काही नियमांचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून महापालिकेनं ही नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी महापालिकेचे एक पथक पाहणी करण्यासाठी खार येथील त्यांच्या निवासस्थानी जाणार आहे.
सध्या तुरुंगात असलेले नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर ४ मे रोजी निर्णय दिला जाणार आहे. कोर्टात निकालाचे वाचन पूर्ण न झाल्याने राणा दाम्पत्याला दोन दिवस कोठडीतच राहावं लागलं. त्यांच्या जामीन अर्जावर ४ मे रोजी निर्णय दिला जाणार आहे. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्याला दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य हे मुंबईत आले होते. मात्र, शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरच तळ ठोकला होता. शिवसैनिकांकडूनही राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं. पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये, म्हणून पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना निवासस्थानाहून ताब्यात घेतलं होतं. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य कोठडीत आहेत.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
