मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याची घटना घडली आहे. यामुळे घडलेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. दरम्यान महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली आहे.

खोपोली एक्झिट जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे टँकर पुणे लेन वर येऊन उलटला. यावेळी टँकरला ती गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.

सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज आहे.

या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर, महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशमन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply