मुंबई : गणेश नाईकांची हायकोर्टात धाव; बेल की जेल? आज फैसला

मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका केली आहे. आज बुधवारी सकाळी ११ वाजता तातडीच्या सुनावणीसाठी याचिका सादर होणार असून न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबईतील एका महिलेकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. दरम्यान, एका महिलेने आपण गेल्या २७ वर्षांपासून गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत त्यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून त्याचे वय १५ वर्ष आहे. हा मुलगा ५ वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पळाला नाही आणि आपली फसवणूक केल्याचा संबंधीत महिलेकडून करण्यात आला आहे. तसंच आपल्यावर जबरदस्ती करून वारंवार अत्याचार, केले शिवाय जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची तक्रार या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. शिवाय या प्रकरणाची नोंद राज्य महिला आयोगाने घेतली होती. आश्चर्य़ाची बाब म्हणजे आरोप करणाऱ्या पीडित महिलेने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच काही दिवसांपुर्वी माध्यमांसमोर सांगितलं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply