मुंबई : कुचिक प्रकरणातील पीडितेला मदतच केली, सर्व आरोपांची उत्तरं देण्यास मी तयार: चित्रा वाघ

मुंबई : शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पीडितेनं 'साम टीव्ही'वर खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवण्यास मला भाग पाडलं असल्याचा खळबळ जनक दावा पीडितने केला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, 'याबाबतीत मुलीने स्वत: मला पत्र पाठवलं आहे. तिचं पोलीस ऐकत नव्हते त्यावेळी आम्ही तिला मदत केली. तसंच आम्ही त्या पीडितेसाठी जे काही करता येईल ते केलं. या मुलीच्या तक्रारीत सगळ्यात पहिल्यांदा मुलगी आमच्याकडे आली. मी स्वत:ला संपवते असं ती म्हणत होती. मी तिचं ते पत्र पुण्यातील सीपींना पाठवलं. मात्र, ऐवढ सगळ करुनही जर ती मी दबाव दिला म्हणत असतील तर त्या सर्व गोष्टी समोर आणाव्या मी सर्व गोष्टींसाठी तयार आहे. आम्ही तिच्या तब्यतीची काळजीच घेतली आहे आणि तिला मदत केली आहे बाकी काही नाही असं वाघ म्हणाल्या.

मात्र, विरोधक जे काही आरोप करतायत की, 'मी काय करतेय कोणाला ब्लॅकमेल करते हे खोट आहेच. मात्र, तुम्ही बलात्काऱ्याला पाठीशी घालता असा आरोपही चित्रा वाघ यांनी साम टीव्हीशी बोलताना विरोधकांवर केला. तसंच मी त्या पीडितेला मदत करण्यात माझा कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ नाही, तीला हॉस्पीटलची गरज होती मग तुम्ही का समोर आला नाही. मी कुठेही यायला तयार आहे त्या सर्व तक्रारीवरुन मी तीला साथ द्यायचा प्रयत्न केला आहे सर्व आरोपांची उत्तर माझ्याकडे आहेत.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या नंतर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली त्या म्हणाल्या, 'त्या मुलीने मांडलं आहे. प्रत्येक तक्रारीची एक प्रक्रीया आहे. मी तिला पोलिस स्टेशनला पाठवलं आपण कुचिकांना सांगितलं दबाव आणू नका असं सांगितलं होतं. तसंच मी तीला मदत करण्याचं पोलिसांना सांगितलं. मी काही केलं नाही असंच त्या मुलीने सांगितलं. मात्र राजकारण करण्यासाठी सतत चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते करुन करुन सतत वक्तव्य केलं.

अनेक घटनांमध्ये मन अस्थिर झाल्यामुळे तिने अनेक गोष्टी उघड केल्या नाहीत मात्र राजकीय भांडवल करण्यासाठी भाजपने तिचा फक्त प्रयत्न केला, भाजपने तरी तिच्यासाठी काय केलं. फक्त शिवसेना भाजप आणि कोणत्याही पक्षाचा असला तरती त्या गोष्टीचं राजकीय भांडवलं होता कामा नये असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply