मुंबई: किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात आता सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काल रविवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे ४ ते ५ साक्षीदारांनी साक्ष नोंदवली आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. सोमय्या आज दिल्लीत गेले असल्याचे त्यांच्या वकीलांकडून सांगण्यात येत आहे. 'सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या फरार झाले असल्याचे शिवसेना  नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा करुन घोटाळा केला असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्याकरिता जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयामध्ये पोहचले नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा, असे आव्हान देखील राऊत यांनी केले आहे. सोमय्या हे सीए असल्याने असा पैसा कसा पचवायचं याची त्यांनी माहिती असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याविषयी ही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयामध्ये असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. ही माहिती गेल्या महिन्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

आयएनएस विक्रांत भंगारामध्ये काढण्याविरोधामध्ये किरीट सोमय्या यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी केला होता. सोमय्या यांच्याबरोबरच इतर नेते देखील सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमय्या होते असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply