मुंबई : उपमुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत

मुंबई : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे कोण उपमुख्यमंत्री होणार असा प्रश्न चर्चेला जात आहे. अशात भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आज ७.३० वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज फक्त त्यांचाच शपथविधी पार पडणार आहे. यानंतर बैठक घेऊन मंत्रिमंडळ ठरवले जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तेव्हापासूनच उपमुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली होती. उपमुख्यमंत्रीपद भाजपच्या वाट्याला येणार का? अशीही चर्चा सुरू झाली.

अशात उपमुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तसेच गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

मात्र, उपमुख्यमंत्रीपद भाजपला मिळते की मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच शिंदे गटाला मिळते हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद शिंदे गटाला भेटल्यास आश्चर्य वाटायला नको.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply