मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस वेवर भीषण पघात, तीनजण गंभीर जखमी

मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी भीषण अपघात झाला. रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, एक कार मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जात होती, तर दुसरीकडे ठाण्याकडून एक कार मुंबईच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान त्याच मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जात असलेल्या कार चालकाचे नियंत्रित सुटले आणि कार थेट दुभाजक तोडून पुलाच्या पलिकडून जाणार्‍या दुसऱ्या कारला धडकली. या घटनेमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्या आणि काही तासांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्व वाहनांसाठी मोकळा करण्यात आला.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांच्या मदतीने तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या जवळच असलेल्या गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या विक्रोळी पोलीस अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply