महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; उद्या मुंबईत समितीची पहिली बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भाबद्दलच्या उच्चाधिकार समितीचे महाराष्ट्र सरकारने पुनर्गठन केले आहे. सर्वपक्षीय समितीमध्ये काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार यांच्यासह शिवसेनेकडून अंबादास दानवे आणि शिंदे सरकारमधील काही मंत्र्याचा समावेश आहे.

समितीची पहिली बैठक येत्या सोमवारी (२१ नोव्हेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. राज्य शासनाने त्यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. पुनर्गठन उच्चाधिकार समितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेअध्यक्ष असतील. विविध राजकीय पक्षांच्या अन्य १४ सदस्यांचाही यात समावेश आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, शंभूराज देसाई मंत्री; तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर, विधानसभा विरोधी पक्ष नेता अजित पवार आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबद्दल सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या विवादामध्ये राज्याची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी या समितीकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply