भोंग्यांबाबत सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक; राज ठाकरे राहणार गैरहजर,

मुंबई : राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवर असलेल्या भोंग्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारकडून आज (सोमवारी) सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र या बैठकील मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत. मस्जिदवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी मुद्दा पुढे केला, पण आज राज्य सरकारकडून बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मात्र ते राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. कारण राज ठाकरे ऐवजी मनसे मनसेचे प्रतिनिधी म्हणून बाळा नांदगावकर सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भोंग्यांच्या वादावरून जातीय तेढ वाढू नये यासाठी ही सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथी गृहावर होणार आहे.

राज्यात मशिदीवरील भोंग्यांवरुन राजकारण तापलं आहे. राज ठाकरेंनी २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी सरकारला मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय घेण्यासाठी ३ मे चा अल्टिमेटम दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून ही बैठक बोलवण्यात आली आहे. यात सर्वच पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

सह्याद्री अतिथी गृहावर होणाऱ्या या बैठकीआधी मनसेचीही बैठक होणार आहे. तसेच सह्याद्री अतिथी गृहावरील सर्वपक्षीय बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.

सह्याद्री अतिथी गृहावरील सर्वपक्षीय बैठकीआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत सरकारला इशारा दिला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, "आजच्या सर्व पक्षीय बैठकीत सर्वोच न्यायालय, विविध उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्णय, तसेच ध्वनी प्रदूषण कायदा याचा सन्मान राखून निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे." असं ट्विट करत त्यांनी सरकराला इशारा दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply