बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने आता पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येचा तपास अद्याप सुरु आहे. त्यातच आता महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांवर भररस्त्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुख्यात वाल्मिक कराडच्या मुलांपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाला जिवाचा धोका असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला महादेव मुंडे यांची दोन मुले प्रणव आणि प्रवीण मुंडे हे आपल्या मित्राकडून परीक्षेसाठी वही आणण्यासाठी स्कुटीवरून सोमेश्वर नगर भागातून जात होते. यावेळी बालाजी आघाव नावाच्या तरुणाने त्या दोघांना मध्येच अडवले.
यावेळी मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ट्युशनला जाताना त्याने आम्हाला पाहिले होते. परत येताना त्याने आम्हाला थांबवून नाव विचारले. तू कुणाचा मुलगा आहेस? अशी विचारणा केली. जेव्हा मी सांगितले की मी महादेव मुंडे यांचा मुलगा आहे, तेव्हा त्याने थेट माझ्या भावाला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्याने आमच्या हातातील कडेही काढून घेतले. यावेळी तिथे काही नागरिक उपस्थित होते, पण कोणीही मदतीला आले नाही.
वाल्मिक कराड कनेक्शन आणि सोशल मीडियाचा पुरावा
या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय मुंडे कुटुंबाने व्यक्त केला आहे. यावेळी मुलांनी संशयित आरोपी बालाजी आघाव याचे इंस्टाग्राम प्रोफाईल तपासले असता, त्यामध्ये वाल्मिक कराड याचे अनेक फॉलोअर्स आणि त्याच्या मुलांचे सुशील व श्रीगणेश कराड याचे फोटो दिसून आले. यामुळे हा हल्ला केवळ योगायोग नसून जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप मुंडे यांच्या मुलांनी केला आहे. त्याला कोणी पाठवले होते आणि कोणाच्या सांगण्यावरून हे केले, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुलांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
दरम्यान महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या प्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांना लेखी अर्ज दिला आहे. या अर्जात त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची मुले सुशील कराड व श्रीगणेश कराड यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे. दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे, सतीश फड आणि वडील भगवान फड यांच्यावर हल्ला होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही दुखापत झाली किंवा अनपेक्षित घटना घडली, तर त्याला पूर्णपणे सुशील आणि श्रीगणेश कराड जबाबदार असतील, असे त्यांनी अर्जात स्पष्ट केले आहे.
नार्को टेस्ट आणि तपासाचा रोख
काही दिवसांपूर्वीच महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोन संशयितांची नार्को टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टमुळे तपासाची सुई कराड टोळीकडे वळत असतानाच हा हल्ला झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि मुंडे कुटुंबाला सुरक्षा देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
[embedded content]
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


