बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह लवकरच सलमान खानच्या ‘द बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ती सहसा तिच्या खासगी आयुष्याबद्दल माध्यमांमध्ये मोकळेपणे व्यक्त होत नाही. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्यातील संघर्षासोबतच आयुष्यातील त्या कठीण काळाचा उल्लेख केला, जेव्हा तिला कुटुंब आणि करिअर या दोघांपैकी एकाचीच निवड करावी लागली होती. अभिनेत्रींच्या तुलनेत जर एखादा अभिनेता सतत ब्रेक घेऊन काम करत असेल तर त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं, असं तुला वाटत नाही का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता.
‘पिपिंगमून’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत चित्रांगदा म्हणाली, “खरं सांगायचं झालं तर मला असं वाटत नाही. चित्रपटांमध्ये काम करताना मी अचानक त्यापासून दूर गेली, पुन्हा इंडस्ट्रीत आली आणि काही काम केलं. त्यानंतर पुन्हा मी कामातून ब्रेक घेतला, कारण त्यावेळी माझ्या वैयक्तिक आयुष्यात समस्या सुरू होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी मी माघार घ्यायची आणि कामातही माझं पूर्ण लक्ष नव्हतं. त्यावेळी विविध शहरांमध्ये मला सतत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे अनेकदा लोकांना असं वाटलं की मी विवाहित आहे. मी यापुढे काम करेन की नाही, असा प्रश्न त्यांना पडला होता. या सर्व अडचणी असतानाही मी थोडंफार चांगलं काम करण्यात यशस्वी झाले. काही चांगले निर्माते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ऑफर्स दिल्या. माझ्या मते अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींचं करिअर खूप छोटं असतं.”
जेव्हा तिला विचारलं गेलं की तिने बॉलिवूडमध्ये ब्रेक का घेतला होता, त्यावर ती म्हणाली, “मी माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळीच विवाहित होते. तो चित्रपट म्हणजे फक्त एकदाच येणारा अनुभव होता. त्यावेळी माझं खासगी आयुष्य काही खास नव्हतं. मला लग्न, कुटुंब आणि खासगी आयुष्य सांभाळणं अधिक गरजेचं वाटत होतं. म्हणून मी कामापासून दूर गेली आणि तो ब्रेक जवळपास सात वर्षांचा ठरला.”
या मुलाखतीत चित्रांगदाने असाही खुलासा केला की, तिने काही चित्रपट यासाठी नाकारले कारण ‘बोल्ड’ सीन्सच्या नावाखाली तिच्याकडून दुसऱ्याच गोष्टींची अपेक्षा केली जात होती. “अनेकदा पटकथेत भूमिकेपेक्षा जास्त जोर दिसण्यावर आणि ग्लॅमरवर दिला जायचा. मला हे ठीक वाटत नाही. मला बोल्डनेसची समस्या नव्हती. परंतु कथा आणि भूमिकेची गरज असेल तरच तिथे बोल्डनेस योग्य वाटतो. मी फक्त पैशांसाठी किंवा इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी इथे आली नाही. जर भूमिका चांगली असेल तर मी अत्यंत मनापासून काम करते”, असं तिने स्पष्ट केलं.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


