पुण्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पावसाचा वाहतुकीवर परिणाम

पुणे : दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला शुक्रवारी झोडपले. जोरदार झालेल्या पावसामुळे शहर व उपनगरांमधील सखल भागात पाणी साचले होते. परिणामी वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहरातील मध्यभागासह सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, बावधन, पाषाणा, औंध, मगरपट्टा, नगररस्ता, कोंढवा, शिवाजीनगर आदी भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. हवामान विभागाकडून शहर व परिसरात पुढील दोन दिवस पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मोसमी पाऊस यंदा लांबला असून तो महाराष्ट्रातून पुढील दोन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तामिळनाडूपासून राजस्थानपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यात मोसमी पाऊस अद्यापही सक्रिय असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात शनिवारपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply