पुणे: पुण्यामध्ये कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसणार आहे, तर त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे, असे राजेश देशमुख यांनी सांगितले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे देशमुख यांनी म्हणाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रबोधन झाल्यावर सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन केले जाणार असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून काल हेल्मेटच्या वापराविषयी जे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे पुण्यात सर्वसामान्यांना हेल्मेट सक्ती केल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून आता हेल्मेट सक्ती नसणार आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. एकीकडे राज्य मास्कमुक्त झाले आहे. पण पुणेकरांवर मात्र, सक्ती करण्यात आली होती. ही सक्ती मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगची नाही, तर हेल्मेटची असण्याचा निर्णय करण्यात आला होता.
पुण्यामध्ये दुचाकीवरून प्रवास करताना १ एप्रिलपासून हेल्मेटसक्ती प्रशासनाचे आदेश देण्यात आले होते. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका अशा सगळ्या परिसरात रस्त्यांवर हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. शिवाय ४ वर्षांवर सर्वांना हेल्मेट वापरणे सक्तीचे असणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले होते. दरम्यान हेल्मेटसक्तीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील या पत्रकात दिली होती.
मात्र, पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. त्यात हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कार चालकांच्या तुलनेमध्ये दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट अधिक असतो. रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांपैकी ६२ टक्के व्यक्तींचा डोक्यावर इजा झाल्याने मृत्यू झाला आहे. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्के आहे. यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुण्यात हेल्मेट सक्ती असणार नाही.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
