
पुणे : पादचाऱ्यांना अडथळा मुक्त मार्गक्रमण करता यावे, या उद्देशाने महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या पादचारी दिन उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ विभागाने घेतला आहे. त्यानुसार येत्या रविवारी लक्ष्मी रस्त्यासह शहरातील २१ मार्गांवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत वाहनमुक्त ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी वाॅकिंग प्लाझासह स्थानिक गटांच्या सहकार्याने लक्ष्मी रस्त्यावर मनोरंजक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
पादचारी दिन साजरा करणारी पुणे ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. त्यानुसार महापालिकेकडून दरवर्षी अकरा डिसेंबर रोजी पादचारी दिन उपक्रम राबविला जातो. गेल्या वर्षी लक्ष्मी रस्ता अर्धा दिवस वाहनमुक्त करून पादचारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पाषाण-सूस रस्ता, औंध ट्रॅफिक पार्क येथे पादचारी अनुकूल प्रकल्प सुरू करण्यात आले होते. यंदा या उपक्रमाची व्याप्ती पथ विभागाकडून वाढविण्यात आली आहे.
लक्ष्मी रस्ता (उंबऱ्या गणपती ते गरुड गणपती), लाल बहादूर शास्त्री रस्ता, बिबवेवाडी रस्ता (रम्यनगरी ते पुष्पमंगल कार्यालय), सहकारनगर रस्ता (गजानन महाराज मठ ते पंचमी हॉटेल), वानवडी (जगताप चौक ते जांभूळकर चौक), लुल्लानगर ते गंगाधाम चौक, हडपसर-महंमदवाडी रस्ता (रहेजा सर्कल ते विबग्योर स्कूल), सासवड रस्ता (गाडीतळ ते गोंधळेनगर), जंगली महाराज रस्ता, पाषाण-सूस रस्ता, मयूर कॉलनी, सिटी प्राइड थिएटर कोथरूड, कर्वे रस्ता (शेलारमामा चौक ते सावरकर स्मारक, पौड फाटा ते डहाणूकर कॉलनी), खराडी दक्षिण मुख्य रस्ता, ५०९ चौक ते विश्रांतवाडी आणि बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी या रस्त्यांवर पादचारी दिन उपक्रम राबविला जाणार आहे.
पादचाऱ्यांना मुक्तपणे संचार करता यावा, वाहनांमुळे होणारी कोंडी आणि प्रदूषण कमी व्हावे तसेच पादचारी मार्ग, सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्राॅसिंगसह अन्य पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. वाहनांचा वाढता वापर नियंत्रित करण्यासाठीही या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. पादचाऱ्यांना या उपक्रमामुळे विना अडथळा मार्गक्रमण करता येणार असून पुस्तिकेचे लोकार्पण, शालेय प्रवास सुधार योजनेअंतर्गत रस्त्यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. शाळांसाठी केलेल्या वाहतूक आराखड्याचीही चाचणी खराडी, डेक्कन आणि पर्वती विभागातील काही शाळांमध्ये करण्यात येणार आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




