पुण्यातील सहकार नगर हादरलं! कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार

Pune : कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पुण्यातील सहकार नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय पीडित तरुणीने या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिमन्यु दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अभिमन्यू शेरेकर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. शेरेकरने एकेदिवशी पाडितेला घरी बोलावले होते आणि कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.एवढ्यावर न थांबता त्याने पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.

एप्रिल २०२२ मध्ये अभिमन्यूच्या मित्र प्रशांत कोळीने पीडितेला ठाण्याला नेले आणि जबरदस्तीने अभिमन्युबरोबर लग्न लावले. पीडितेने फोटो डिलीट करण्याचे सांगितले असता अभिमन्युचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडिल दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली. तसेच आईवडिलांना मारुन टाकू अशी धमकी दिली.

दरम्यान, या सर्व त्रासाला कंटाळून पीडितेने सहकारनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलील करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *