पुण्यातील नाना पेठमधील स्पंजच्या गोडाऊनला आग

नाना पेठ: क्वार्टर गेट, चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज शेजारील असलेल्या गोडाऊनला 31 मार्च रोजी रात्री 11:30 सुमारास भीषण आग लागली. यावेळी चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामध्ये कामगार रंजन कश्यप यांची प्रकृती गंभीर असल्याची समजते. तसेच एक सामान्य नागरिक (नाव समजू शकले नाही) हे जखमी असून अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांचावर 108 मधे उपचार करुन केईएमला नेण्यात आले आहे. तसेच फायरमन सुधीर नवले यांच्या पायाला मुका मार लागला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

यावेळी चारचाकी, दुचाकी स्पेअर पार्ट, स्पंज, लाकडी सामान गोडाउन, चक्की कारखाना असे आदी चार हजार स्के फुटांचे पत्र्यांचे शेड मध्ये आगीने पेट घेतला. सदर घटनेत मोठे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. एका जेसीबीच्या सहाय्याने गोडाऊन मधील जळीत समान काढण्यास मदत झाली. यावेळी आग विसविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 फायरगाड्या, 2 अँब्युलन्स दाखल करण्यात आल्या. यावेळी रात्री 12:41 वा. आग नियंत्रणात करण्यात आली असून कुलिंग करण्याचे काम अद्याप सुरू आहे. अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्यअधिकारी सुनील गिलबिले यांनी माहिती देताना सांगितले.

यावेळी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुनील गिलबिले, सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर, सचिन मांडवकर, चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले, अजीम शेख असे आदी 60 ते 70 कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply