पुणे : ११ तारखेपासून गाईच्या दुधाला दोन रुपयांची दरवाढ

पुणे : पुणे जिल्हा दुध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्षपदी केशरताई पवार विराजमान होताच तिस-याच दिवशी दुधाला प्रतीलिटर दोन रुपये भाव वाढवून ३५ रुपये एवढा भाव देत असल्याची घोषणा राजुरी (ता.जुन्नर) येथे केली. येत्या ११ तारखेपासून ही दरवाढ सर्व दुध उप्तादकांना दिली जाणार असून जेष्ठ संचालक बाळासाहेब खिलारी व भाऊ देवाडे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करुन उपस्थित दुध उप्तादक शेतक-यांच्या त्यांनी टाळ्या वसुल केल्या.

यावेळी खिलारी म्हणाले, वाड्यावस्त्यांवरील शेतक-यांच्या हिताचा विचार करणारा कात्रस संघ असून केशरताईच्या नेतृत्वात आम्ही आणखी प्रगती करु. यावेळी शरदचंद्र पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक भाऊ देवाडे, माजी सभापती दिपक औटी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके,गणेश दुध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे, उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे, माजी अध्यक्ष गोविंद औटी, सुभाष औटी, तुकाराम डुंबरे, अशोक हाडवळे, ज्ञानेश्वर घंगाळे, लक्ष्मण औटी, निवृत्ती औटी, राजाराम औटी, विशाल हाडवळे, गणेश शिंदे, किरण औटी, सुनिता फावडे, पुष्पा हाडवळे, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाळे, राजेंद्र औटी,निवृत्ती हाडवळे ,राजीव औटी,धिरज औटी, व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रईस चौगुले व आभारप्रदर्शन एम.डी.घंगाळे यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply