पुणे : हडपसरमध्ये मध्यरात्री कालव्यात मोटार कोसळली, पाणी कमी असल्याने मोटारचालक आणि सहप्रवासी बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली

पुणे : हडपसरमधील जुन्या कालव्यात मोटार कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. कालव्यात पाणी कमी असल्याने मोटारचालक आणि सहप्रवासी बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली. हडपसर परिसरातील शिंदेवाडी येथील जुन्या कालव्यात मोटार पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान; तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कालव्यात पाणी कमी असल्याने मोटारचालक आणि सहप्रवासी बाहेर पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहायाने कालव्यात पडलेली मोटार बाहेर काढली. कालव्याजवळच्या रस्त्यावर अंधार असतो. मोटारचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार कालव्यात पडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, असे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply