पुणे : स्मशानभूमी दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे - स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारावेळी चितेवर पेट्रोल ओतताना आगीचा भडका उडून झालेल्या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकास अटक केली आहे.

अनिल बसण्णा शिंदे (वय ५३) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर गणेश सर्जेराव रणसिंग (वय ४९, रा. वाघोली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रतीक कांबळे (वय २४, रा. ताडीवाला रस्ता) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रतीक कांबळे यांच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी कैलास स्मशानभूमीत आणण्यात आला. चितेला अग्नी देत असतानाच गणेश रणसिंग यांनी प्लॅस्टिकच्या कॅनमधील पेट्रोल चितेवर ओतले. आगीचा भडका उडून त्यात जवळच थांबलेले आठ जण होरपळले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply