पुणे : विमाननगर भागात १० लाखांचे अमली पदार्थ जप्त; बिहारमधील तरुण अटकेत

पुणे : विमाननगर भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून कोकेन, मोटार, मोबाइल संच असा १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अख्तर नुरलहोदा शेख (वय ३४, सध्या रा. कलवड वस्ती, धानोरी, मूळ रा. मुजफ्फरपूर, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख विमाननगर भागात मोटारीतून अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने विमाननगर परिसरातील कोणार्कनगर सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर थांबला होता. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून दहा लाख ४२ हजार ४०० रुपये किंमतीचे ५२ ग्रॅम कोकेन, मोटार, रोकड, मोबाइल संच असा १५ लाख ५७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, विशाल शिंदे, योगेश माेहिते, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply