पुणे : ले. कर्नल पुरोहित ‘द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशन सोहळा; पुण्यात भीम आर्मी बहुजन एकता आणि मूलनिवासी मुस्लिम मंचाचे आंदोलन

पुणे : ‘ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशन सोहळा पुण्यातील एस.पी.कॉलेज येथे थोड्याच वेळात पार पडणार आहे. पण त्यापूर्वीच पुण्यातील भीम आर्मी बहुजन एकता आणि मूलनिवासी मुस्लिम मंच या दोन संघटनांकडून टिळक स्मारक मंदिरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कर्नल पुरोहित यांच्या विरोधात घोषणा देण्यात येत आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील, भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर आधारित आणि स्मिता मिश्रा लिखित ‘ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा एस.पी. कॉलेजच्या लेडी रमाबाई सभागृहात माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला असून या कार्यक्रमास संजय बर्वे हे प्रकृतीच्या कारणांमुळे तर सत्यपाल सिंह हे पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला जाणार असल्याने गैरहजर आहेत.

भीम आर्मी बहुजन एकता मंचाचे अध्यक्ष दत्ता पोळ, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी दोन दिवसांपूर्वी एस. पी. कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून मालेगाव बॉम्बस्फोटाचे प्रकरण एनआयए न्यायालयात प्रलंबित असून पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये करणे योग्य राहणार नाही. हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा.अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली होती.तरी देखील तो कार्यक्रम होत असल्याने,शहरातील विविध संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply