पुणे : लाडक्या मांजराच्या मृत्यूमुळे डॉक्टरांना ६ जणांकडून जबर मारहाण; रुग्णालयही फोडलं

पुणे : एखाद्या घरातील पाळीव प्राणी हा एकप्रकारे घरातील सदस्यच बनून जातो. त्यात मांजरासारखां गोंडस प्राणी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण असतो. मात्र हेच 'मांजरप्रेम' एका डॉक्टरला महागात पडलं आहे. पुण्यात उपचारासाठी आणलेल्या लाडक्या मांजराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या एका महिलेसह पाच जणांनी क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये १० डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. डॉ. रामनाथ बापू ढगे (वय ५१) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून एका महिलेसह चार अनोळखी इसमांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींनी फिर्यादी यांच्या भाजी मंडई जवळील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये उपचारासाठी मांजराला आणले होते. यावेळी उपचार सुरू असताना मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी 'मांजर कसे झोपले, आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो" अशी धमकी दिली. फिर्यादी यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 

या मारहाणीत फिर्यादी डॉक्टर यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या क्लिनिकमधील वस्तूंची देखील तोडफोड देखील केली आहे. या प्रकरणाचा हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply