पुणे : 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा'; घोषणा देत आणि काळे झेंडे दाखवून स्वराज्य संघटनेकडून राज्यपालांचा निषेध

पुणेः पुण्यामध्ये राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या राज्यभरात निषेध होतोय.एका कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज पुण्यामध्ये आलेले आहेत. पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले.

यावेळी पोलिसांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.

दरम्यान, राजभवन येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. राज्यपाल भगत सिंह कोषयारी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजभवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राज्यपाल कोश्यारी यांचा यशदा या ठिकाणी एक कार्यक्रम आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *