पुणे : येरवडा कारागृहात कैद्याच्या डोक्‍यात दगड घालुन मारहाण

पुणे : सिगारेटची राख डोळ्यात गेल्याच्या कारणावरुन काही दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्याच्या डोक्‍यात दगड घालून त्यास जखमी करण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना येरवडा कारागृहात गुरुवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास घडली. राकेश ऊर्फ राख्या जॉनी यकट, सुरेश दयाळू (दोघेही रा. येरवडा मध्यवर्ती कारागृह) असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल लगस (वय 22 ) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे तिघेही सराईत गुन्हेगार असून ते येरवडा कारागृहातील बरॅक क्रमांक सातमध्ये एकत्र राहतात. पंधरा दिवसांपूर्वी फिर्यादी अमोल व राकेश यांची सिगारेटची राख डोळ्यात गेल्याच्या कारणावरुन भांडणे झाली होती. दरम्यान, बुधवारी रात्री फिर्यादी अमोल झोपला होता. त्यानंतर पुर्वीच्या कारणावरुन आरोपींनी संगनमताने गुरुवारी पहाटे दीड वाजता संगनमताने फिर्यादीस दगडाने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी अमोल याच्या डोक्‍याला जखम झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply