पुणे : मोबाईलवर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद देत नाही म्हणून महिलेवर चाकूने वार

पुणे : वारंवार मोबाईलवर संपर्क साधूनही प्रतिसाद देत नाही, म्हणून एका २८ वर्षीय महिलेला तिच्या ओळखीच्या युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिच्या हातावर चाकूने वार केले आहेत. चाकण येथे ही घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

जालिंदर दिगंबर मधे (वय – २३, रा. ओझर, जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने चाकण पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ९ जुलैला रात्री साडेआठ वाजता फिर्यादी महिला घरी एकटीच होती. तेव्हा आरोपी तिच्या घरी आला. ‘तू माझा फोन का उचलत नाही. आता माझ्यासोबत चल”, असे महिलेला म्हणाला. त्यास महिलेने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भाजी कापण्याचा चाकू घेऊन महिलेच्या उजव्या हातावर वार केले. याप्रकरणी चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *