पुणे : मेंदूमृत तरुणीच्या अवयवदानामुळे दोन लष्करी जवानांना निरोगी अवयव

पुणे : मेंदूमृत तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोन लष्करी जवानांना निरोगी अवयव प्राप्त झाले. पुण्यातील कमांड रुग्णालय आणि अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या पुणे विभागाकडून हे अवयवदान यशस्वी करण्यात आले. मेंदूमृत तरुणीच्या अवयवांमुळे पाच गरजूंना निरोगी नवजीवन मिळत आहे.

एका गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या मरणासन्न तरुणीला लष्कराच्या दक्षिण कमांडच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या मेंदूचे कार्य सुरु असल्याची कोणतीही लक्षणे न दिसल्याने तज्ज्ञ डॅाक्टरांनी तिला मेंदूमृत जाहीर केले, तसेच तिच्या कुटुंबीयांना अवयवदानाच्या पर्यायाबाबत माहिती दिली. तरुणीच्या कुटुंबीयांनी सर्व परवानग्या दिल्यानंतर तिची दोन मूत्रपिंडे, यकृत, डोळे यांचे दान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर मूत्रपिंड विकारांचा सामना करणाऱ्या लष्करातील दोन जवानांवर तरुणीच्या मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. तिचे डोळे लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रपेढीतर्फे गरजू रुग्णांसाठी जतन करण्यात आले असून यकृताचे प्रत्यारोपण रुबी हॅाल क्लिनिकमधील गरजू रुग्णावर करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply