
पुणे : मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर आल्हाददायक थंडीची चाहूल लागली. मात्र वाहनांचा धूर आणि दिवाळीमुळे केलेली फटाक्यांची आतषबाजी अशा कारणांनी मुंबई-पुण्याच्या हवेची गुणवत्ता बिघडली आहे. ‘सफर’च्या नोंदींनुसार मुंबईची हवा वाईट पातळीवर, तर पुण्याची हवा समाधानकारक पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. तर दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे.
सफर या संस्थेकडून देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येते. पावसामुळे हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र पावसाळा सरल्यानंतर गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. तसेच दिवाळीमुळे करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही वातावरण धूरग्रस्त झाले आहे. सफरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) ५० पर्यंत एक्यूआय असलेली हवा चांगली, १०० ते २०० एक्यूआयदरम्यानची हवा समाधानकारक, २०० ते ३०० एक्यूआयदरम्यानची हवा वाईट, ३०० ते ४०० एक्यूआय दरम्यानची हवा अत्यंत वाईट आणि ४०० एक्यूआयवरील हवा गंभीर मानली जाते. सफरच्या नोंदींनुसार सोमवार-मंगळवारी मुंबईची हवा वाईट पातळीवर, तर पुण्याची हवा वाईट ते मध्यम पातळीवर असल्याचे दिसून आले.
हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर असताना श्वास घेण्यास त्रास, दम लागणे असे प्रकार होऊ शकतात. तर वाईट पातळीवर असताना जास्त काळ घराबाहेर राहणे अपायकारक ठरू शकते. बाहेर असताना मुखपट्टीचा वापर करणे आवश्यक असते. मंगळवारी दुपारपर्यंत पुण्याच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक ते वाईट या स्तरावर होती. दुपारनंतर त्यात सुधारणा होऊन ती समाधानकारक पातळीवर गेली. तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर असल्याचे दिसून आले. येत्या दोन दिवसांत पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारण्याची, तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट पातळीवरच राहण्याचा अंदाज ‘सफर’कडून वर्तवण्यात आला आहे. तर देशातील सर्वांत प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. पुढील दोन दिवस दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीरच राहण्याचा ‘सफर’चा अंदाज आहे.
एका आठवड्यात हवा बदलली
गेल्या आठवड्यात मुंबई, पुणे, दिल्ली आणि अहमदाबाद या चार शहरांच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर होती. मात्र एकाच आठवड्यात हवेच्या गुणवत्तेत बदल झाल्याचे दिसून येत आहे.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



