पुणे: महापालिकेच्या सफाई कामगाराला व्यावसायिकाकडून मारहाण; टिंबर मार्केटमधील घटना

पुणे : महापालिकेच्या सफाई कामगाराला बेदम मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकास अटक केली. भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात ही घटना घडली. रघुसिंग बालसिंग भाटी (वय २९, रा. भुसारा सोसायटी, हरकानगर, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संतोष जाधव (वय ३९, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भाटी यांचे टिंबर मार्केट परिसरात राजदीप हार्डवेअर दुकान आहे. जाधव सफाई कामगार आहेत. भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहासमोर असलेल्या रस्ता सफाईचे काम जाधव करत हाेते. त्या वेळी राजदीप हार्डवेअरची बिले कचऱ्यात सापडल्याने जाधव यांनी बिले राजदीप हार्डवेअर दुकानाच्या पायरीवर ठेवली. दुकानाच्या पायरीवर कचरा का टाकला, अशी विचारणा करुन जाधव यांना भाटी यांनी शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणणे; तसेच मारहाण केल्या प्रकरणी भाटी यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करत आहेत.

Follow us -



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply