पुणे : भू-संपादनाअभावी हडपसर टर्मिनल रखडले

हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम भू-संपादनाअभावी रखडल्याचे समोर आले आहे. जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत बैठका सुरू आहेत. जागा मिळेपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर स्थानकावर फलाट वाढविण्यासाठी पुण्याच्या बाजूला जागा कमी पडत आहे. ही जागा खासगी मालकीची आहे. जागा विकत घेण्यासाठी रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत बैठका सुरू आहेत. दोन्ही कार्यालयांकडून संयुक्तपणे जमिनीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणानंतर नेमकी किती जागा घ्यावी लागणार आहे, यावर निर्णय होईल. तोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही.

पुढील एक-दोन महिन्यांत पुणे रेल्वे स्थानकातील काही गाड्या हडपसर स्थानकात हलविल्या जाणार आहेत. पुणे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यामुळे काही गाड्या इतर स्थानकांतून सोडण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.

सीसीटीव्हीला लागेना मुहूर्त

पुणे रेल्वे स्थानकात सुरक्षेच्यादृष्टीने नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आणखी विलंब लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वेकडे सीसीटीव्हीसाठी निधीही उपलब्ध आहे परंतु, हे काम रेलेटेलकडे आहे. हे काम लवकरच सुरू होईल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे. सध्या स्थानकात ६१ कॅमेरे असून, त्यापैकी बहुतेक कॅमेऱ्यांची स्थिती खराब आहे. खराब कॅमेरे बदलून त्याजागी तसेच इतर ठिकाणी नवीन कॅमेरे बसविले जाणार आहे. त्यानंतर स्थानकातील कॅमेरांची एकूण संख्या १२० वर पोहोचणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply