पुणे : भुयारी मार्गची सुरक्षितता रामभरोसे

रामवाडी : चंदननगर येथे पुणे महानगरपालिके कडून कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पादचारी भुयारी मार्ग मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दैनिक सकाळ मध्ये या वृत्ताची बातमी प्रसिद्ध होताच नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागा कडून दखल घेतली. संपुर्ण भुयारी मार्ग स्वच्छ करण्यात आला. परंतु रात्रीच्या वेळेस ये जा करणारे लहान मुले,जेष्ठ नागरिक व महिलांच्या सुरक्षितता प्रश्न सुटला नसल्याने ' जैसे थे ' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भुयारी मार्गातून ये जा करणार्‍या पादचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी बसविण्यात आलेले cctv कॅमेरे गायब झाले असल्याने लहान मुले ,महिलां, जेष्ठ नागरिकांची सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगररोड रस्ता सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये जा करता यावे यासाठी भुयारी पादचारी मार्ग बांधण्यात आला. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी

तळीराम आणि बेघर अशा अनेकांचा वावर वाढला आहे. ना सुरक्षा रक्षक ना cctv कॅमेरे त्यामुळे ये जा करणार्‍या पादचाऱ्यांना असुरक्षित वाटत आहे. कॅमेरे चोरीला गेले तरीही प्रशासना कडून पोलिस स्टेशन ला तक्रार केली नाही. प्रशासनाच्या संबंधित विभागाने भुयारी मार्गच्या सुरक्षितता कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.

पूर्वी जे भुयारी मार्ग मध्ये cctv कॅमेरे बसविण्यात आले होते ते वैयक्तिक बसवले होते त्यामुळे चोरीला गेलेल्या कॅमेराची तक्रार पोलिसां स्टेशन कडे करण्यात आली नाही. लवकरात लवकर नगररोड क्षेत्रीय कार्यालय असो या नागरिकांचा सहभाग त्यांच्या मदतनिधी तून रामवाडी, विमाननगर आणि चंदननगर येथील भुयारी मार्ग मध्ये cctv बसविण्यात येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply