पुणे : बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा; पशुधन अधिकारी घेणार निर्णय

पुणे : राज्य सरकारने लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून बैलांच्या शर्यतींवर बंदी घातली होती. ही बंदी शिथिल करण्यात आली आहे. पुण्यात संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्याने लम्पी त्वचा रोगाचा आढावा घेऊन शर्यतींना परवानगी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने स्थानिक पातळीवर लम्पी त्वचा रोगाचा आढावा घेऊन जनावरांचा बाजार आणि शर्यतींना परवानगी देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांचे शर्यतीस परवानगी देण्याबाबत अधिकार दिलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी कोणताही जनावरांचा बाजार भरवणे तसेच प्राण्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply