पुणे बाजार समितीकडून चोर सोडून शेतकऱ्याला फाशी

पुणे : “रत्नागिरचा हापूस कर्नाटक आंबा” म्हणून जप्त करण्याचा प्रकार मंगळवारी गुलटेकडी मार्केट यार्डात घडला आहे. अजब म्हणजे हा आंबा कोणत्या जातीचा तपासण्यासाठी कोणताही अनुभव नसणाऱ्या एका परप्रांतीयाला बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला. तर शेतकऱ्याने विनवणी करूनही बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना दमदाटी केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सोमवारी शेतकरी महादेव लक्ष्मण काळे यांनी दापोली येथून हापूस आंब्याच्या शंभर पेट्या विक्रीसाठी आणल्या होत्या. परंतु हा आंबा कर्नाटक आंबा असल्याचे म्हणत बाजार समितीने शेतकऱ्यांच्या पेट्या ताब्यात घेतल्या. शेतकऱ्याने सातत्याने विनवणी करूनही त्यास प्रतिसाद न देता उलट शेतकऱ्यालाच दमदाटी करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीकडून चोर सोडून शेतकऱ्याला फाशी असा प्रकार घडला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply