
पुणे : विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मांडताना गटनेत्याचा पक्षादेश (व्हीप) महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. या वेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहणार असून, बंडखोर आमदारांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांगितले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘विधानसभेच्या अध्यक्षपदी अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना पाळावाच लागणार आहे.
प्रस्तावाच्या वेळी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयावरही ही प्रक्रिया अवलंबून आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इतके दिवस ‘विशेष काळजी’ घेण्यात आली. मात्र, सभागृहात आल्यानंतर हे ‘विचारवंत’ (बंडखोर आमदार) काय करणार आहेत, याकडे लक्ष राहणार आहे. सभागृहात आल्यानंतर या आमदारांच्या मतप्रवाहात बदल झालेला दिसेल, असेही पवार म्हणाले.
राज्यपालांनी कोणाला पेढा भरवताना पाहिले नाही – शरद पवार
विधिमंडळ सभागृहात १९६७ ते १९९० या कालावधीत मी होतो. अनेक वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. या कालावधीत राज्यपालांनी कोणाला पुष्पगुच्छ किंवा पेढा भरवताना पाहिले नाही. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्यावेळी एका आमदाराकडून शपथविधीची सुरुवात इतर नावाने केल्याने कोश्यारी यांनी हटकले होते. त्या वेळी कोश्यारी यांनी माझा दाखला दिला होता. मात्र,एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतांना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची नावे घेत सुरुवात केली. त्यांना कोणीही हटकले नाहीच, याउलट कोश्यारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, अशा शब्दांत पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना खोचक टोला लगावला.
खेळात राजकारण आणत नाही
राज्य कुस्तीगीर संघटनेचा मी अध्यक्ष असलो तरी खेळ स्पर्धा आयोजित करणे, खेळाडूंना मदत करणे, त्यांना चांगल्या सुविधा, प्रशिक्षण मिळवून देणे यासाठी साहाय्य केले. राहुल अवारे, अभिजित कटके, उत्कर्ष काळे आदी खेळाडू यांचे खेळ आणखी चांगले होण्यासाठी त्यांना मदत केली. काही खेळाडूंना वैद्यकीय मदत केली, तरी कुस्तीगीर संघटना बरखास्तीचा निर्णय का घेण्यात आला? खेळात आम्ही कधी राजकारण आणत नाही, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




