पुणे : परदेशात नोकरीच्या आमिषाने चौघांची फसवणूक

पुणे : परदेशातील एका तारांकित हाॅटेलमध्ये नोकरीच्या आमिषाने चौघांची साडेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी सक्सेस करिअर कन्सलटन्सीचे संचालक राधेशाम महाराणा, जितेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत प्रकाश जाधव (वय २२, रा. बिजलीनगर, चिंचवड) याने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सक्सेस करिअर कन्सलटन्सीकडून परदेशातील तारांकित हाॅटेलमध्ये नोकरीचे आमिष दाखविले होते. जाधव, त्याचे मित्र वेदांत शिंदे,दानिश मोैलवी, शिवम दुबे यांनी आरोपी महाराणा आणि जाधव यांच्याशी संपर्क साधला.परदेशात नोकरीच्या आमिषाने त्यांनी चौघांकडून साडेचार लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना परदेशात नोकरी मिळवून दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाधवने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply