पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास परवानगी

पुणे - पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे ३० खाटांचे (Beds) ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यास राज्याच्या आरोग्य मंत्रालयानेगुरुवारी (ता. ७) मंजुरी दिली आहे. हे जिल्ह्यातील विसावे ग्रामीण रुग्णालये असणार आहे. दरम्यान, या रुग्णालयाच्या इमारत बांधकामाबाबत आणि आवश्‍यक पदनिर्मितीबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने याबाबत दिलेल्या मंजुरी आदेशात म्हटले आहे.

या रुग्णालयाच्या मंजुरीचा आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात सद्यःस्थितीत औंध येथील एक जिल्हा रुग्णालये, पाच उपजिल्हा रुग्णालये आणि १९ ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. पूर्वीच्या १९ ग्रामीण रुग्णालयात आता वडगाव रासाई येथील रुग्णालयाने एकची भर पडणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

या नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने आरोग्य सहसंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव आरोग्य सहसंचालक कार्यालयाने पुढील मंजुरीसाठी १४ फेब्रुवारी २०२२ ला आरोग्य मंत्रालयाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर केल्याचे आदेश आरोग्य विभागातील अवर सचिव डी. एन. केंद्रे यांनी पुणे जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply