पुणे : गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना आक्रमक; येरवडा चौकात ‘तिरडी आंदोलन’

पुणे : वाढती महागाई,पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमती तसेच घरगुती व व्यावसायिक गॅसच्या किंमतीत झालेली प्रचंड दरवाढ याविरोधात पुण्यातील शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून येरवडा चौकात शिवसेनेच्या वतीने 'तिरडी आंदोलन' करण्यात आले. या आंदोलनात गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी सर्वसामान्य गृहिणींना मातीच्या चुलींचे वाटप केले.

यावेळी शिवसैनिकांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रातील मोदी सरकारमुळे घरगुती गॅसचा दर ४०० रूपया वरून १००० रूपया पर्यंत पोहोचला आहे. तरी देखील मोदी सरकार सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

'सबका साथ, सबका विकास' असा नारा मोदी सरकारने निवडणुकीत दिला होता. मात्र, मोदी सरकारच्या काळात फक्त गॅस दरवाढ आणि इंधन दरवाढीचा विकास झाला. सर्वसामान्य गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. सर्वसामान्यांचे होणारे हाल थांबविण्यासाठी, मोदी सरकारने घरघुती गॅसच्या वाढलेल्या किंमती तातडीने कमी कराव्यात अशी मागणी या वेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply