पुणे : मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने मुंबई परिसरासह कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणखी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कायम आहे. प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी पावसाच्या आगमनापासून या दोन्ही विभागातील घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला होता. मात्र, या भागांत तो काही प्रमाणात सुरू झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी (२१ जून) मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत पालघर येथे राज्यातील सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे पावसासाठी काही प्रमाणात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरातील शाखेपासून पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचा कहर सुरू असताना अरबी समुद्रातील शाखेकडे मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. मोसमी पाऊस सध्या मध्य प्रदेश ओलांडून राजस्थानच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. महाराष्ट्रात सध्या सध्या अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरावरूनही बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. दक्षिण कोकणामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई परिसरातही काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. कोकण विभागात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने घाट विभागांत पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
गेल्या चोवीस तासांत पालघर येथे २१०, तर डहाणू येथे १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण विभागातील गुहागर, म्हाळसा, वेंगुर्ला, वसई आदी भागांत ६० ते ७० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. पेण, मालवण, देवगड, श्रीवर्धन, कुडाळ आदी भागांत मोठा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात लोणावळा, मुळशी, वेल्हे, ओझरखेड आदी भागात पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड आदी भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील चार दिवस काही भागांत मुसळधारांचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यांतही प्रामुख्याने घाट विभागात चार ते पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत या विभागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
शहर
- Pune : स्वारगेट अत्याचारप्रकरणातील पीडित तरूणीला राज्य सरकारकडून आधार; ३ लाखांची मदत जाहीर
- Dombivali : डोंबिवली हादरली! रिक्षा चालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार; अज्ञातस्थळी नेलं अन्...
- Congress: "मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी, माणुसकीच्या नावावर.." गर्भवती महिला मृत्यूप्रकरणावर विजय वडेट्टीवार कडाडले
- Pune Water Supply: गुड न्यूज! पुणेकरांची चिंता मिटली, यंदा पुण्यात पाणीकपात नाही
महाराष्ट्र
- Satara News : बेपत्ता चिमुकलीचा शेतातच मृतदेह सापडला, अपघात की घातपात? ५ वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं?
- Pune : स्वारगेट अत्याचारप्रकरणातील पीडित तरूणीला राज्य सरकारकडून आधार; ३ लाखांची मदत जाहीर
- ST Crisis : लाडकींना घर बसल्या पैसे, मग एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनाला कात्री का? अर्धा पगार मिळाल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक
- Dombivali : डोंबिवली हादरली! रिक्षा चालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार; अज्ञातस्थळी नेलं अन्...
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे