पुणे: शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पीडितेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ तरुणीच्या मदतीसाठी पुढे आल्या. मात्र या तरुणीनं चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केली की, वाघ यांनीच कुचिक यांच्याविरोधात जबरदस्ती पोलीस तक्रार दाखल करण्यास आणि जबाब देण्यास भाग पाडले. पीडित तरुणीच्या या आरोपांनंतपर चित्रा वाघ यांच्यावर विरोधक तुटून पडले होते. मात्र आज पुन्हा तरुणीनं माध्यमांसमोर येत कुचिक बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. यानंतर चित्रा वाघ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत माझ्यावर आरोप करणारे आता कुठे आहेत? असा सवाल करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असा आरोप केला.
पीडित तरुणीने सामटीव्हीशी बोलताना कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले. पीडित तरुणीनं आरोप केला की, रघुनाथ कुचिक यांनी बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला आहे. जर गुन्हा मागे घेतला नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी कुचिक यांनी दिली असाही आरोप या पीडित तरुणीनं केला. तसेच बंदुकीचा धाक दाखवून समजूतीच्या करारावर सह्या घेतल्या असंही तरुणीचं म्हणणं आहे. याबाबत पीडित तरुणीने मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-मेल पाठवत न्याय देण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी चित्रा वाघ म्हणाल्या की, मी या तरुणीला मदतच केली आहे. मात्र आता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. पण ज्या पद्धतीने माझ्यावर खोटे आरोप झाले आहे, त्याबाबत मी पोलिसांना पत्र दिलं आहे. माझ्यासाठीही हा नवा अनुभव होता. पुर्ण ताकदीने तिच्यासोबत उभं राहिलं असतानाही तिने माझ्यावर आरोप केले. सुरुवातीला फेब्रुवारीपासून माझ्याशिवाय तिच्यासोबत कुणी नव्हतं, पण ज्यादिवशी तिने चित्रा वाघचं नावं घेतलं त्यादिवशी सगळे माझ्यावर तुटून पडले. माझ्यावर खोटे आरोप केले, ज्या महिलांनी माझ्याविरोधात आंदोलनं केली, माझ्याविरोधात वाटेल तसं बोलंल गेलं. या सगळ्या महिलांनी आता उभं रहावं. एखादी केस हातात घेतली की, त्याचं फॉलोअप घ्याययं असतं. त्या मुलीला कोण धमकी देतंय? कोण तिला बंदूक दाखवतंय? याचा तपास व्हायला हवा.
माझ्यासारख्या हजारो महिला असा पीडित मुलींना मदत करत असतात. पण, असा अनुभव येत असेल तर त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. चित्रा वाघचं नाव आल्यावर ज्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या त्यांनी आता पुढे येत त्या मुलीच्या पाठीशी उभ रहावं. तक्रार करावी, पोलिस स्टेशनच्या बाहेर आंदोलनं करावी असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
शहर
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
महाराष्ट्र
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
गुन्हा
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
























Subscribe to my channel


