पुणे – कात्रज डेअरीच्या १० एकर जागेवर महापालिकेचे आरक्षण

पुणे - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या २० एकर जागेपैकी १० दहा एकर जागेवर पुणे महानगरपालिकेने आरक्षण  टाकले आहे. याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनाने सुमारे पंचवीस वर्षापूर्वीच घेतला आहे. या आरक्षणामुळे भविष्यात कात्रज डेअरीला जागेअभावी उपपदार्थ निर्मिती आणि विपणनासाठी मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. या आरक्षणाबाबतची माहिती डेअरीच्या नवीन संचालक मंडळाने पालकमंत्री अजित पवार यांना दिली आहे. यानुसार पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे.

कात्रज डेअरीच्या निम्‍या जागेवर आरक्षण पडल्याचे समजता, पालकमंत्री पवार यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी याबाबत फोनद्वारे चर्चा केली आहे. हे आरक्षण उठविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेशही पवार यांनी विक्रम कुमार यांना दिला आहे. दरम्यान, हे आरक्षण उठविण्यासाठी आणि कात्रज डेअरीच्या उत्पादनांचा आवाका वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डेअरीच्या नव्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी सांगितले.

पुण्यातील कात्रज परिसरात जिल्हा दूध संघाचे मुख्यालय आणि डेअरी आहे. या दूध संघाच्या स्थापनेनंतर डेअरीच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून सुमारे २२ एकर गायरान जमीन मिळालेली आहे. यापैकी सुमारे अडीच एकर क्षेत्र हे न्यायालयीन आदेशानुसार भारती विद्यापीठाला मिळाले आहे. सध्या तेथे २० एकर क्षेत्र शिल्लक आहे. परंतु यापैकी काही जागा सार्वजनिक रस्त्यासाठी देण्यात आली आहे.

भारती विद्यापीठ आणि सार्वजनिक रस्त्यासाठी गेलेल्या जागेनंतर शिल्लक राहिलेल्या जागेतही पालिकेने १९९७ मध्ये क्रीडांगणासाठी आरक्षण टाकल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. परंतु हे आरक्षण टाकताना ही जागा कात्रज डेअरीच्या नावावर नव्हती. त्यामुळे तेव्हा या आरक्षणाबाबत फारशी माहिती उपलब्ध झाली नव्हती, असे या दूध संघाचे मावळते अध्यक्ष विष्णू हिंगे, माजी अध्यक्ष गोपाळ म्हस्के आणि बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.

जिल्हा दूध संघाच्या नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची सोमवारी (ता.४) निवड करण्यात येणार होती. त्यामुळे पालकमंत्री पवार यांनी या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध व्हावी, या उद्देशाने नावे निश्‍चित करण्यासाठी रविवारी (ता.३) सायंकाळी सहा वाजता सर्व नवीन संचालकांची बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत संचालक मंडळाने पवार यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पवार यांनी या बैठकीतूनच पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना फोन लावल्याचे संचालकांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply